Mumbai News : मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट
Raj Thackeray - Supriya Sule : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंनी हुतात्मा चौकात भेट दिली. यावेळी त्याठिकाणी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.
महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या हुतात्मा चौकात आज खासदार सुप्रिया सुळे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आपुलकीच्या गप्पा झालेल्या बघायला मिळाल्या. दोन वेगळ्या विचारांच्या पक्षाचे नेते अशा प्रकारे भेटल्याने सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यानंतर राज ठाकरे हे परदेश दौऱ्यावर होते. आता ते मुंबईत परतले असून आज महाराष्ट्र दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे त्यांनी यंदाही पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हुतात्मा चौकात भेट दिली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. या दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी आपुलकीची भेट बघायला मिळाली आहे.
Published on: May 01, 2025 11:22 AM
