राज ठाकरेंची पूर्णपणे जिरलीय… गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली
गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राज ठाकरेंकडे मतदार शिल्लक नाहीत. आता त्यांच्याकडे पूर्वीसारखे लोक आकर्षित होत नाहीत. 'वेगवेगळ्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या आणि पावसाळ्यात बाहेर येणाऱ्या छोट्या छोट्या सिझनल बेडकांचे आवाज असतात तसा राज ठाकरेंचा आवाज आहे.
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत आता प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्तेही उतरले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राज ठाकरेंकडे मतदार शिल्लक नाहीत. आता त्यांच्याकडे पूर्वीसारखे लोक आकर्षित होत नाहीत. ‘वेगवेगळ्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या आणि पावसाळ्यात बाहेर येणाऱ्या छोट्या छोट्या सिझनल बेडकांचे आवाज असतात तसा राज ठाकरेंचा आवाज आहे, अशा खोचक शब्दात त्यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला. ‘राज ठाकरेंची पूर्णपणे जिरलेली आहे’ असंही सदावर्ते म्हणाले. राज -उद्धव ठाकरे यांना माहीत आहे, ‘आत्ता त्यांच्याकडे असं काहीच शिल्लक नाही, ज्याने मतदार त्यांच्याकडे आकर्षित होतील, म्हणून खोटा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, असं वक्तव्य करत सदावर्तेंनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला आहे.
Published on: Jan 13, 2026 01:00 PM
