Vaishnavi Hagawane Case : विरोध झुगारून प्रेमविवाह, बापानं बक्कळ हुंडा मोजला; शेवटी..; काय आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण?

Vaishnavi Hagawane Case : विरोध झुगारून प्रेमविवाह, बापानं बक्कळ हुंडा मोजला; शेवटी..; काय आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण?

| Updated on: May 21, 2025 | 5:57 PM

Vaishnavi Hagawane Case Details : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. मात्र वैष्णवीच्या प्रेमविवाहाचा करुण शेवट देखील तितकाच भयावह आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केली आहे. मात्र वैष्णवी हगवणे हिचा हुंड्यासाठी जाच होत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे. शवविच्छेदन अहवालात देखील वैष्णवीच्या शरीरावर काही जखमा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सध्या वैष्णवीची सासू, नवरा आणि नणंद हे अटकेत आहेत. तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर हे फरार आहेत.

राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुळशी तालुकाध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगा शशांकसोबत वैष्णवीचा प्रेमविवाह झाला होता. घरच्यांचा विरोध झुगारून या दोघांनी लग्न केलं होतं. घरच्यांनी देखील मुलीच्या इच्छेपुढे हार पत्करून थाटात लग्न लाऊन दिलं. मात्र आता वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जमीन खरेदीसाठी हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या कुटुंबाकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र प्रेमविवाह असूनही शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या सगळ्या करणांमुळे वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे.

Published on: May 21, 2025 05:56 PM