Video : देवेंद्र भुयारला स्वाभिमानीचा आमदार म्हणू नका, त्याची बुडावर लाथ मारुन हकालपट्टी केलीय- राजू शेट्टी

Video : देवेंद्र भुयारला स्वाभिमानीचा आमदार म्हणू नका, त्याची बुडावर लाथ मारुन हकालपट्टी केलीय- राजू शेट्टी

| Edited By: | Updated on: Jun 11, 2022 | 5:36 PM

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) सहाव्या जागेवर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभव पक्तरावा लागलाय. भाजपचे धनंजय महाडिक मोठ्या फरकानं विजयी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास लागलेल्या या निकालामुळं भाजपच्या गोटात उत्साह तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटात शांतता आणि नाराजीनाट्य पाहायला मिळालं. या पराभवाचं खापर शिवसेनेचे आमदार संजय राऊत यांनी छोट्या पक्षाचे आणि काही अपक्ष आमदारांवर […]

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) सहाव्या जागेवर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभव पक्तरावा लागलाय. भाजपचे धनंजय महाडिक मोठ्या फरकानं विजयी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास लागलेल्या या निकालामुळं भाजपच्या गोटात उत्साह तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटात शांतता आणि नाराजीनाट्य पाहायला मिळालं. या पराभवाचं खापर शिवसेनेचे आमदार संजय राऊत यांनी छोट्या पक्षाचे आणि काही अपक्ष आमदारांवर फोडलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी सहा आमदारांची नावंही घेतली. त्यात आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांच्या नावाचाही समावेश आहे. भुयार यांचं नाव घेताना राऊतांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उल्लेख केला. त्यावर राजू शेट्टी चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.

Published on: Jun 11, 2022 05:36 PM