छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सत्य तेच बोललो, वडिलांच्या वक्तव्यानंतर Sambhaji Raje यांचं ट्विट

| Updated on: May 28, 2022 | 8:19 PM

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांहीही राजेंना पुढे करून मतांचं विभाजन करणे ही फडणवीसांची खेळी असल्याचे म्हटले होते. यावर आता जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र आता संभाजीराजेंच्या ट्विटने नवा संभ्रमही निर्माण झाला आहे.

Follow us on

कोल्हापूर : शिवसेनेने (Shivsena) आपल्या निर्णयावर ठाम राहात संजय पवार यांना उमेदवारी दिल्याने संभाजी छत्रपती (Chatrapati Sambhajiraje) यांनी राज्यासभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (shrimant Shahu chhatrapati) यांनी संजय यांना तिकीट मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने संधी दिली त्याचा आम्हाला आनंद आहे. असे म्हणतानाच त्यांनी छत्रपती घराण्याचा कोणताही अपमान झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवा असे म्हणता येणार नाही, असे म्हणत संभाजीराजे यांचे कानही टोचले. त्यानंतर आता त्यावर संभाजीराजे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. याबबत ट्विट करत संभाजीराजे म्हणतता, “छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.” असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.