VIDEO : Subhash Desai यांना मंत्रिपद दिलं, मला नाही, वाईट वाटलं-Ramdas Kadam

VIDEO : Subhash Desai यांना मंत्रिपद दिलं, मला नाही, वाईट वाटलं-Ramdas Kadam

| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 3:45 PM

आम्हा ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद देऊ नका असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानंतरही सुभाष देसाई यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्याचं दु:ख झालं. देसाईंना मंत्रिपद द्यायला नको होतं, अशी खदखद शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली.

आम्हा ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद देऊ नका असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानंतरही सुभाष देसाई यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्याचं दु:ख झालं. देसाईंना मंत्रिपद द्यायला नको होतं, अशी खदखद शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली. कदम यांनी ही खदखद व्यक्त करतानाच अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावरही सवाल केला आहे. रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप खोडून काढतानाच अनिल परब यांच्यामुळे पक्ष रसातळाला जात असल्याचंही स्पष्ट केलं. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. आमचे वय 60-70 वर्ष झाली आहेत. आता आम्हाला मंत्रिपद देऊ नका, असं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं.