Ranjeet Kasle : रणजित कासलेकडून सरकारविरोधात घोषणाबाजी; पोलिसांकडून तोंड दाबण्याचा प्रयत्न
बडतफर पोलिस अधिकारी रणजित कासले याला आज किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी कासले याने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. किल्ला कोर्टात ही कोठडी सुनावण्यात आलेली आहे. यावेळी कासले याने सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या आहेत. इन्कलाब जिंदाबादचा नारा यावेळी कासले याने दिला आहे. महाराष्ट्र सरकार हाय हाय असा देखील नारा यावेळी कासले याने लगावला. त्यावेळी पोलिसांकडून त्याचं तोंड दाबण्याचा प्रयत्न झाल्याचंही दिसून आलं.
सोशल मीडियावर नेत्यांची पोलखोल केल्याप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला अटक करण्यात आली होती. मुंबई गुन्हे शाखेने रणजीत कासलेला दिल्लीवरून अटक कासलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी पूर्ण झाल्यावर आज किल्ला कोर्टात कासलेला हजर करण्यात आलं होतं.
Published on: Jun 02, 2025 06:05 PM
