आठवले का पुन्हा ते दिवस; आता पुन्हा लागणार बँकेसमोर लाईन; मात्र याच्याआधिच पंपावर काय झालं बघाच
Image Credit source: tv9

आठवले का पुन्हा ते दिवस; आता पुन्हा लागणार बँकेसमोर लाईन; मात्र याच्याआधिच पंपावर काय झालं बघाच

| Updated on: May 20, 2023 | 7:55 AM

RBI ने 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. तर RBI ने बाजारात 2000 च्या नोटा बदलून देण्याचा पर्याय दिला आहे. आरबीआयने बँकांना 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत 2000 च्या नोटा बदलण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी संध्याकाळी यासंदर्भात एक पत्र जारी करताना RBI ने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याची माहिती दिली. मात्र, सध्याच्या नोटा अवैध ठरणार नाहीत. RBI ने ‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. तर RBI ने बाजारात 2000 च्या नोटा बदलून देण्याचा पर्याय दिला आहे. आरबीआयने बँकांना 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत 2000 च्या नोटा बदलण्याचे निर्देश दिले आहेत. एका वेळी जास्तीत जास्त वीस हजार रुपयांच्या नोटा बदलल्या जातील. मात्र त्याच्याआधिच आता अनेक व्यापाऱ्यांनी 2000 च्या नोटावरून आपले हात वर केले आहेत. असाच एक बोलका व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात नोट बंदिची घोषणा होताच एका पेट्रोल पंप चालकाने आपल्या कर्मचाऱ्याला आता 2000 नोट घेऊ नको अशा सुचना केल्या आहेत. त्याचदरम्यान ग्राहकाकडे तिच नोट आहे. यावर तो ही नोट नाही टालणार अत्ताच फोन झाला असे सांगत आहे. तर मला मालकाशी बोलू द्या असा चारचाकीवाला बोलताना दिसत आहे. तर पहा काय परिणाम झाला आहे. बंदी आदेशाने या व्हीडिओत

Published on: May 20, 2023 07:55 AM