रोहिणी खडसे यांची पोलीस आयुक्तांसोबतची भेट रद्द

रोहिणी खडसे यांची पोलीस आयुक्तांसोबतची भेट रद्द

| Updated on: Jul 28, 2025 | 1:06 PM

प्रांजल यांच्या अटकेनंतर काही तासांनी रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर त्या पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार होत्या, परंतु ही भेट अचानक रद्द झाली.

पुणे पोलिसांनी खराडी येथे रेव्ह पार्टीवर छापा टाकून ती उधळून लावली. या कारवाईत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सातत्याने टीका करत असून, या पार्श्वभूमीवर खेवलकर यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. काहींनी तर या कारवाईमागे संशय व्यक्त केला आहे.

प्रांजल यांच्या अटकेनंतर काही तासांनी रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर त्या पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार होत्या, परंतु ही भेट अचानक रद्द झाली. प्रांजल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी आयुक्तांशी भेट घेऊन रेव्ह पार्टी प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ही भेट रद्द होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी खडसे सध्या पुण्यात असल्या तरी त्या आयुक्त कार्यालयात जाणार नाहीत, यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Published on: Jul 28, 2025 01:05 PM