Rohit Pawar : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आमचा’ तिसरा डोळा कधी उघडत नाही, रोहित पवारांची नितेश राणेंवर टीका

Rohit Pawar : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आमचा’ तिसरा डोळा कधी उघडत नाही, रोहित पवारांची नितेश राणेंवर टीका

| Updated on: Aug 06, 2022 | 6:05 PM

उदयपूरनंतर अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांना समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हे यांची हत्या झाली, या सारखाच प्रयत्न ४ ऑगस्टला अहमदनगरमधील कर्जत तालुक्यात घडल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. 

मुंबई : आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर टीका केली आहे. ‘राजकीय पोळ्या शेकण्यासाठी मात्र आमचं हिंदुत्व जागृत होते. भंडाऱ्यात अत्याचार झालेली महिला आज मृत्यूशी झुंज देत आहे. परंतु याबाबत आवाज उठवायला ‘आमचं हिंदुत्व’ कधी जागृत होत नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आमचा’ तिसरा डोळा कधी उघडत नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे कर्जतमध्ये एका युवकावर हल्ला झाल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उदयपूरनंतर अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांना समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हे यांची हत्या झाली, या सारखाच प्रयत्न ४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राणे यांना प्रत्युत्तर दिलंय.

 

 

Published on: Aug 06, 2022 06:03 PM