Rohit Pawar : ‘लक्ष्मण हाके यांची काहीही चूक नाही’, रोहित पवारांनी घेतली हाकेंची बाजू?
Rohit Pawar On Laxman Hake : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही पक्षांचा आज वर्धापन दिवस साजरा होत आहे. त्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज साजरा होणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनावर टीका केली आहे. आज साजरा होणारा दिवस ओबीसी समाजासाठी काळा दिवस असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘यात लक्ष्मण हाके यांची काहीही चूक नाही. सत्तेतले काही मोठे नेते त्यांना संगत असतात तुम्ही असंच बोला, तसंच बोला. महाराष्ट्रात जातीवाद, धर्मवाद राहिलाच पाहिजे असं काही मोठ्या नेत्यांना वाटतं. पण मोठ्या नेत्यांना ते सरळ बोलता येत नाही, कारण ते सत्तेत आहेत. म्हणून ते असे लक्ष्मण हाके यांच्यासारखे सामान्य कुटुंबातले लोक आहेत, त्यांना पुढे करतात, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
Published on: Jun 10, 2025 10:20 AM
