Russia Ukraine War: ‘मिशन गंगा’मध्ये भारतीय वायुसेनेचा सहभाग

| Updated on: Mar 01, 2022 | 12:39 PM

ऑपरेशन गंगा आँपरेशनला भारतीय वायुदलाने (IAF) सुद्धा सहकार्य करावे. ऑपरेशनला सहकार्य करण्यासाठी C-17 विमानांचा वापर करावा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दिले आहेत.

Follow us on

Russia Ukraine War: युक्रेनमधील भारतीय दूतावासाने भारतीयांना आज तातडीने कीव सोडण्याचा सल्ला दिला आहे. ऑपरेशन गंगा ऑपरेशनला भारतीय वायुदलाने (IAF) सुद्धा सहकार्य करावे. वायुदलाचे विमान सुद्धा आँपरेशन गंगा मध्ये असल्यास मोठ्या प्रमाणात मदत आणि ऑपरेशन लवकरच होईल. ऑपरेशनला सहकार्य करण्यासाठी C-17 विमानांचा वापर करावा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दिले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी स्पाइसजेट आज स्लोव्हाकियाच्या कोसीस येथे विशेष निर्वासन उड्डाण चालवणार आहे. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी निर्वासनांवर देखरेख करण्यासाठी भारत सरकारचे विशेष दूत म्हणून कोसीसला जात असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे युक्रेनमध्ये अडकलेल्या 182 भारतीयांना घेऊन सातवे विमान मुंबईत दाखल झाले आहे.