जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर, रशियाकडून धमकीवजा इशारा!

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर, रशियाकडून धमकीवजा इशारा!

| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 4:50 PM

रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध सुरु झालंय त्याला सात दिवस होत आले आहेत. रशियानं त्यांच्या न्यूक्लिअर डिटरन्स फोर्सला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध अणवस्त्र युद्धाच्या दिशेनं जाणार का याची भीती व्यक्त करण्यात येत होती. काही तज्ज्ञांनी सध्या सुरु असलेला वाद तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात असल्याचं म्हटलं होतं. आता रशियाचे […]

रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध सुरु झालंय त्याला सात दिवस होत आले आहेत. रशियानं त्यांच्या न्यूक्लिअर डिटरन्स फोर्सला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध अणवस्त्र युद्धाच्या दिशेनं जाणार का याची भीती व्यक्त करण्यात येत होती. काही तज्ज्ञांनी सध्या सुरु असलेला वाद तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात असल्याचं म्हटलं होतं. आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जी लावरो (Sergey Lavrov) यांनी तिसरं महायुद्ध हे अणवस्त्रांचं असून विनाशकारी असेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळं रशिया आणि युक्रेन युद्धामुळं जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचं स्पष्ट झालंय. हे युद्ध मनुष्यांसाठी विनाशकारी ठरण्याची शक्यता आहे.