या सरकारला सळो की पळो करुन सोडू

या सरकारला सळो की पळो करुन सोडू

| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 11:28 PM

रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता पक्ष किसान मोर्चातर्फे विरोध करुन सरकारला सळो की पळो करुन सोडू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महावसुल सरकारकडून लूट होत असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशात एफआरपीचा कायदा असतानाही या सरकारने एफआरपी दोन हफ्त्यात देण्याचा निर्णय घेऊन कायदा पायदळी तुडविण्याचे काम केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हफ्त्यात एफआरपी देण्यात आल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखर सम्राट तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता पक्ष किसान मोर्चातर्फे विरोध करुन सरकारला सळो की पळो करुन सोडू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.