Video : बाळासाहेबांचा विचार राज ठाकरे पुढे घेऊन जात आहेत- संदीप देशपांडे
मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलंय. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार होगा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असून दोघंही हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात गेल्या […]
मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलंय. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार होगा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असून दोघंही हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर राज ठाकरे यांच्या फोटोसह संदीप देशपांडे यांनी केलेलं विधानाचे अनेक अर्थ आता राजकीय जाणकारांकडून काढले जात आहेत. बाळासाहेबांचा विचार राज ठाकरे पुढे घेऊन जात आहेत, असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
