Sandipan Bhumare vs Chandrakant Khaire : ते न भेटताच निघून गेले, हा त्यांचा मोठेपणा, संदीपान भुमरेंचा चंद्रकांत खैरेंना टोला

| Updated on: Aug 15, 2022 | 11:23 AM

Sandipan Bhumare vs Chandrakant Khaire : कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांना माजी खासदार चंद्रकात खैर हे न भेटताच निघून गेले. यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना भुमरे यांनी टोला लगावलाय.

Follow us on

औरंगाबाद : देशासह राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा (Azadi ka Amrit Mahotsav) उत्साह आहे. दरम्यान, मराठवाड्यातील दोन नेत्यांमध्ये यावेळी नाराजी पहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumare) यांना न भेटताच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) निघून गेले. औरंगाबादेत ध्वजारोहणानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले होते. यावर भुमरे यांनी भाष्य केलंय. तर यावेळी त्यांनी इतरही प्रश्नांची उत्तरं माध्यमांना दिली. ते म्हणाले की, ‘सच्चा शिवसैनिकाला कॅबिनेट मंत्रीपद दिलं हे महत्वाचं आहे. मी नाराज राहू शकत नाही. जो काम करतो, तो कधीच नाराज राहू शकत नाही.’ दरम्यान, याचवेळी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांना माजी खासदार चंद्रकात खैर हे न भेटताच निघून गेले. यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना भुमरे म्हणाले की, ते न भेटताच निघून गेले, हा त्यांचा मोठेपणा. यावर त्यांनी बोलावं. त्यांना काही काम असेल त्यामुळे गेले असतील. अनेक वर्षानंतर स्थानिक माणसाला ध्वजारोहणाची संधी मिळाली ती फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे, मी सर्व देशबांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो.