Sangli | रस्ता बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रक्टरकडून 4 टक्के कमिशन, सरपंचाला लाचलुचपत विभागाकडून अटक

| Updated on: Jun 16, 2021 | 11:44 AM

आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39) याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Follow us on

 

आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39) याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. करगणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मंगळवारी (15 जून) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सरंपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेतक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी करगणी येथून रस्ता काँक्रीट करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाचे बिल मंजूर करुन जमा केल्याच्या मोबदल्यात करगणीचे सरपंच गणेश खंदारे याने बिलाच्या 4 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी केली असता सरपंच खंदारे याने तक्रारदारांकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.