Rupali Chakankar : चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांचे धमकीचे फोन येताय – संगीता भालेराव

Rupali Chakankar : चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांचे धमकीचे फोन येताय – संगीता भालेराव

| Updated on: May 27, 2025 | 3:34 PM

Sangita Bhalerao Filed complaint against rupali chakankar : महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या संगीता भालेराव यांनी आज टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधला आहे.

व्यक्तीला कायद्याचं ज्ञान आहे, ज्या व्यक्तीला सामाजिक जाणीवांचं भान आहे, अशा व्यक्तीला महिला आयोगचं अध्यक्षपद द्यायला हवं, या तळमळीच्या भूमिकेतून मी पोस्ट केली आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या संगीता भालेराव यांनी म्हंटलं आहे. चाकणकर यांच्या वैयक्तिक द्वेष करत नाही. मी कोणतीही आक्षेपहार्य पोस्ट देखील केलेली नाही. पण त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद आहे. त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाही आहेत. याच कारणामुळे मी त्यांना सांगितलं त्यांनी महिला आयोगाचं पद सोडावं, एवढंच मी म्हंटलं आहे. आज जर त्यांनी हगवणे यांच्या मोठ्या सुनेच्या तक्रारीची दखल घेतली असती तर वैष्णवी जीवंत राहिली असती. याच भावनेतून मी ती पोस्ट केली आहे असंही यावेळी भालेराव यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, संगीता भालेराव यांनी तक्रार दिल्यानंतर टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना पुढे सांगितलं की, मी फेसबुकवर केलेल्या पोस्टनंतर मला चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांचे फोन येत होते. मी कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केलेली नाही. त्यांनी पदमुक्त व्हावे अशी मागणी केली होती, अशी माहिती भालेराव यांनी दिली.

Published on: May 27, 2025 03:32 PM