Sanjay Raut | ..ते असे उद्योग करणार नाहीत, एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत अन् मर्दांगी असेल तर… राऊतांची जहरी टीका

Sanjay Raut | ..ते असे उद्योग करणार नाहीत, एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत अन् मर्दांगी असेल तर… राऊतांची जहरी टीका

| Updated on: Jan 05, 2026 | 11:59 AM

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, ठाण्यातील तो व्हिडीओ अत्यंत गंभीर असल्याचं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हंटलय. पोलिस, उमेदवारांना ठाण्यातील शिंदेंच्या घरी घेऊन येताना त्या व्हिडीओमध्ये दिसू्न येत आहे, असा आरोप राऊतांनी केलाय. उमेदवारांना घरातून पकडून, गाडीत टाकून शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणण्यात आलंय. वर्दीची शान न राखता पोलीस हे काम करतात असा आरोप देखील संजय राऊतांनी केलाय.

ठाकरे गटाचे उमेदवार विक्रांत घाग यांना एका पोलीस अधिकाऱ्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेले आणि त्यानंतर घाग यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, असा खळबळजनक दावा करत मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट व्हिडीओ दाखवत गंभीर आरोप केला. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, ठाण्यातील तो व्हिडीओ अत्यंत गंभीर असल्याचं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हंटलय. पोलिस, उमेदवारांना ठाण्यातील शिंदेंच्या घरी घेऊन येताना त्या व्हिडीओमध्ये दिसू्न येत आहे, असा आरोप राऊतांनी केलाय. उमेदवारांना घरातून पकडून, गाडीत टाकून शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणण्यात आलंय. वर्दीची शान न राखता पोलीस हे काम करतात असा आरोप देखील संजय राऊतांनी केलाय.

मनसे नेते अविनाश जाधव आणि शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. याचाच अर्थ शिंदेंची शिवसेना, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला घाबरलेत अशी टिका राऊतांनी केली आहे. हिम्मत असेल तर लढून दाखवा, आमचा पक्ष चोरला चिन्ह देखील चोरला, आम्ही लढतोय तुम्ही देखील लढून दाखवा असं वक्तव्य राऊतांनी केलंय. एकनाथ शिंदेंमध्ये हिम्मत आणि मर्दांगी असेल तर ते असे उद्योग करणार नाहीत पण त्यांनी असचं आयुष्यभर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय अशा शब्दात राऊतांनी शिंदेंवर टीका केली आहे.

Published on: Jan 05, 2026 11:59 AM