Sanjay Raut Video : ‘गृहराज्यमंत्री दिव्यच’, पुणे अत्याचार प्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून राऊतांनी घेतला योगेश कदमांचा समाचार

Sanjay Raut Video : ‘गृहराज्यमंत्री दिव्यच’, पुणे अत्याचार प्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून राऊतांनी घेतला योगेश कदमांचा समाचार

| Updated on: Feb 28, 2025 | 12:02 PM

संजय राऊतांनी सरकारवर तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर टीकेची झोड उठवली. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली, म्हणजे फार उपकार केले का? असा खोचक सवालही त्यांनी केला.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्यात बलात्कार झालेल्या तरुणीवरून एक बेजबाबदार वक्तव्य केलं. यानंतर विरोधकांकडून एकच संताप व्यक्त केला जात आहे. ‘रोखणं, हाणामारी, प्रतिकार काहीही घडलेलं नाही. अतिशय शांततेनं ती घटना घडली असं म्हणत तरुणींना आरडाओरडा का केला नाही’ असा प्रतिसवाल करण्याचा प्रयत्न गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला. दरम्यान, योगेश कदम यांनी केलेल्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे नेते संदय राऊत चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत ” असे म्हणत राऊतांनी कदम यांच्यावर टीका केली. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली, म्हणजे फार उपकार केले का? आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत. ते म्हणतात की बसमध्ये हाणामारी झाली, शांतपणे बलात्कार पडला, त्यामुळे बाहेर कळलं नाही, ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे. एका महिलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते, विनयभंग, बलात्कार होतो, आणि तिने स्ट्रगल केलं नाही , हा त्यांचा शब्द आहे. तिने स्ट्रगल केलं नाही त्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही. तिचा गळा दाबला, तोंड दाबलं, तिच्यावर जबरदस्ती केली.आणि हे काय बोलतात, असं म्हणत संजय राऊतांनी योगेश कदमांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Feb 28, 2025 11:53 AM