Sanjay Raut | राज ठाकरे बोलतील तेव्हाच बोलू… बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊत यांचा सवाल

Sanjay Raut | राज ठाकरे बोलतील तेव्हाच बोलू… बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊत यांचा सवाल

| Updated on: Feb 14, 2026 | 12:31 PM

जे काही बंद दाराआड किंवा भिंतीआड बोललं जात आहे, त्यावर आम्ही का बोलू? लक्षात ठेवा, मनसे आणि शिवसेना यांची युती खूप घट्ट आहे. कोणी काहीही बोललं तरी त्या युतीला काही फरक पडणार नाही. कोणाचीही इच्छा असली तरी ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडणार नाही,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.

आज संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना चंद्रपूरमधील घडामोडींविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, “चंद्रपूरमध्ये जे घडले त्यावर आम्ही प्रतिक्रिया दिली आणि त्यावर मनसेच्या नेत्यांनी स्वतःची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर काल मनसेच्या बैठकीत कार्यकर्ते आणि नेत्यांनी ठाकरे गटावर आरोप केले आहेत. मुंबईसह इतर ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी आम्हाला अपेक्षेनुसार मदत केली नाही. अनेक ठिकाणी आमच्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या नाहीत, काही ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले गेले, काही ठिकाणी आमचे उमेदवार असताना एबी फॉर्म दिला गेला. ही मनसेच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भावना आहे आणि ती राज ठाकरे यांच्यासमोर देखील मांडली गेली आहे. या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत आपले मत व्यक्त केले आहे.

संजय राऊत यांनी सांगितले की, “मी परवा राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आम्ही बोललो. तुम्ही म्हणत आहात ‘कार्यकर्ते काय बोलले’, पण जेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरे स्वतः काही बोलतील, तेव्हा आम्ही त्यावर आपली प्रतिक्रिया देऊ. आता जे काही बंद दाराआड किंवा भिंतीआड बोललं जात आहे, त्यावर आम्ही का बोलू? लक्षात ठेवा, मनसे आणि शिवसेना यांची युती खूप घट्ट आहे. कोणी काहीही बोललं तरी त्या युतीला काही फरक पडणार नाही. कोणाचीही इच्छा असली तरी ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडणार नाही,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.

Published on: Feb 14, 2026 12:31 PM