Sanjay Raut : गिरीश महाजन दलाल आहेत, संजय राऊतांची विखारी टीका

Sanjay Raut : गिरीश महाजन दलाल आहेत, संजय राऊतांची विखारी टीका

| Updated on: Jun 03, 2025 | 12:26 PM

Sanjay Raut Press Conference : संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना चांगलंच धारेवर धरत टीका केली आहे.

पक्ष फोडण्यासाठी गिरीश महाजन हे भाजपने नेमलेला दलाल आहे, असं शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाही, असंही राऊत म्हणाले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानावर आज पत्रकारांशी बोलताना समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या आठ दिवसात त्यांच्याकडे कोणी राहणार नाही, असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार मध्यमांना बोलताना केलं होतं.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुळात गिरीश महाजन यांचा पक्ष जागेवर आहे का? भ्रष्ट, ठेकेदार लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघाले आहेत. हातात पोलीस आहे, पैसे आहे. त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायला भाजपने जे दलाल नेमले आहेत, त्यातले पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहेत. महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाही, ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल, अशी जहरी टीका राऊतांनी केली.

Published on: Jun 03, 2025 12:26 PM