Sanjay Raut :  राज अन् फडणवीसांच्या भेटीचं राऊतांनी सांगितलं कारण; म्हणाले, कदाचित ते…

Sanjay Raut : राज अन् फडणवीसांच्या भेटीचं राऊतांनी सांगितलं कारण; म्हणाले, कदाचित ते…

| Updated on: Aug 21, 2025 | 11:20 AM

राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षानिवासस्थानी झालेल्या खलबतांवर संजय राऊत यांना सवाल केला असता काय म्हणाले राऊत?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट झाली. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना सवाल केला असता त्यांनी या भेटीवर खोचक भाष्य केले. ‘कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले असतील’, असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण सांगत खोचक टोला लगावला.

पुढे राऊत असेही म्हणाले की, राज्यासंदर्भातील काही प्रश्न असतील. फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली. दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासारखी शहरं बुडाली आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या भेटीमुळे कुणाला इतका त्रास करून घेण्याची गरज नाही. आम्हाला त्रास झालाय का? नाही. आम्हाला माहिती आहे काय कारण आहे, असं खोचकपणे संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षातील नेते भेटत असतात. आम्ही सुद्धा अनेकदा भेटतो. त्यावर चर्चा का करायची? भेटूद्या… जे दोन नेते एकमेकांना भेटतात ते दोन नेतेच भेटण्याचं कारण सांगू शकतात असंही राऊत म्हणाले.

Published on: Aug 21, 2025 11:10 AM