तुमच्यात हिंमत असेल तर…, संजय राऊत यांचा किरीट सोमय्या यांना थेट इशारा

तुमच्यात हिंमत असेल तर…, संजय राऊत यांचा किरीट सोमय्या यांना थेट इशारा

| Updated on: Feb 01, 2023 | 11:27 AM

हिंमत तर भाजप पुरस्कृत उद्योगपतींनी देशाला खड्ड्यात टाकलं त्यावर बोला, संजय राऊत यांचं किरीट सोमय्या यांनां चॅलेंज

मुंबई :  अनिल परब यांच्या कार्यालयावर काल कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर अनिल परब यांचे समर्थक आणि काही शिवसैनिकांनी जोरदार राडा केल्याचे पाहायला मिळाले. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, तुम्ही खोट्या तक्रारी आणि गुन्हे आमच्यावर दाखल करणार असाल, तर आम्ही राडे करून खरे गुन्हे घेण्यास तयार आहोत. अनिल परब यांच्या कार्यालयावर काल हातोडा मारण्यात आला ते कार्यालय त्यांचे नव्हते, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही भाजपचा मुलुंडचा पोपटलाल हा वारंवार अनिल परब, संजय राऊत तर कधी किशोरी पेडणेकर यांची बदनामी करत आहे. ते आम्ही आता थांबवू असेही राऊत यांनी म्हटले आहे, तुमच्यात जर हिंमत असेल तर भाजप पुरस्कृत उद्योगपतींनी देशाला खड्ड्यात टाकलं त्यावर भाष्य करा, अदानी घोटाळ्यावर बोला, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट इशारा दिली आहे.

Published on: Feb 01, 2023 11:27 AM