Sanjay Raut : चुन चुन के नंतर मारा, आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
पहलगाम हल्ल्यावरून आज पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरत गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
चुन चुन के मारेंगे हे दरवेळी म्हणतात. पण त्या आधी त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. मुळात जे घडलं त्याला जबाबदारच गृहमंत्री आहे, असा हल्लाबोल शिवसेना उबठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेतून केला आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले की, पहलगाम हल्ल्यात जे 27 निरपराध लोक मारले गेले ती जबाबदारी घेऊन अमित शाह यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तसं करत नसतील तर पंतप्रधान मोदींनी त्यांना प्रायश्चित्त देऊन त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आमच्या विरोधी पक्षाचं संघटन सरकारचं समर्थन करतं आहे. समर्थ करा, पण त्या अधि गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा. सरकारबरोबर आहात म्हणजे सरकारच्या चुकांबरोबर आहात का? त्यांच्या चुकांवर कोणी बोलायच? असा घरचा आहेर देखील संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.
Published on: May 02, 2025 10:40 AM
