Sanjay Raut | मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान

Sanjay Raut | मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान

| Updated on: Mar 07, 2026 | 1:16 PM

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्याला विधान परिषद निवडणुकीचा वेध लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधान परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळात कोरोना आणि इतर अनेक संकटांनंतरही त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व उभे केले.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्याला विधान परिषद निवडणुकीचा वेध लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधान परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळात कोरोना आणि इतर अनेक संकटांनंतरही त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व उभे केले. त्यांच्या नेतृत्वात राज्याला एक स्पष्ट दिशा मिळाली असून, उद्धव ठाकरे म्हणजे विरोधी पक्षाचा एक बुलंद आवाज आहे, हे विधानसभेत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी दिसते. संजय राऊत म्हणाले की, “नक्कीच आमची इच्छा आहे की उद्धव ठाकरे पुन्हा विधानसभेत प्रवेश करावा. विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या की त्यावर चर्चा होईल. मी माझं वैयक्तिक मत मांडलं आहे, पण शेवटी महाविकास आघाडी एकत्र राहिल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल आणि तो योग्यवेळी जाहीर केला जाईल.” यावरून स्पष्ट होते की, शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीशी सलग राहण्यावर भर देत असून उद्धव ठाकरे यांच्या विधानसभेत पुनरागमनाला प्राधान्य दिले जाणार आहे.

Published on: Mar 07, 2026 1:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us