आम्ही मुंबईत म्हातारे झालो म्हणून…, फडणवीसांच्या ‘सर्टिफाईड नागपूरकर’ला राऊतांचं प्रत्युत्तर

आम्ही मुंबईत म्हातारे झालो म्हणून…, फडणवीसांच्या ‘सर्टिफाईड नागपूरकर’ला राऊतांचं प्रत्युत्तर

| Updated on: Jan 09, 2026 | 1:31 PM

आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली. आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो. मुंबई लढवून मिळवली आहे असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर चांगलाच पलटवार केला आहे. जमिनीतून बटाटी येतात, तशी बटाटी मिळाली नाहीत, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना चांगलंच चिडवलं आहे.

नागपूर मध्ये झालेल्या तर्री पोहा विथ देवा भाऊ या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, या कार्यक्रमात बोलताना मी सर्टिफाईड नागपूरकर आहे. मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास करू शकले नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. या टीकेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य करत फडणवीसांच्या टीकेवर पलटवार केला आहे.

संजय राऊत म्हणाले, आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली. आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो. मुंबई लढवून मिळवली आहे असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर चांगलाच पलटवार केला आहे. जमिनीतून बटाटी येतात, तशी बटाटी मिळाली नाहीत, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना चांगलंच चिडवलं आहे. आम्ही जेव्हा मुंबईसाठी लढत होतो तेव्हा फडणवीसांचा जन्म देखील झाला नव्हता, असंही राऊत यांनी म्हणत फडणवीसांच्या टीकेवरून हल्लाबोल केला.

Published on: Jan 09, 2026 01:31 PM