Sanjay Raut : आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार, ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut : आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार, ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांनी स्पष्टच सांगितलं

| Updated on: Jun 05, 2025 | 1:19 PM

Sanjay Raut PC : खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर मोठं विधान केलं आहे.

आमचे नेते एका सुरात बोलता आहेत. आदित्य ठाकरे हे सगळे एका सुरात बोलत आहेत की आम्ही सकारात्मक आहे, असं संजय राऊत यांनी आज ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावर म्हंटलं आहे. पत्रकारांशी बोलताना ठाकरे बंधूंच्या युतीवर सुरू असलेल्या चर्चेवरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, आमचे नेते एका सुरात बोलत आहेत. आदित्य ठाकरे यांनीही आपण सकारात्मक असल्याचे विधान केले आहे. त्यावर आक्षेप घेण्याचे कोणतेही कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ व स्पष्ट आहेत. महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार आहोत. मनसेचे इतर नेते कोण आहेत? हे मला माहिती नाही. पण राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काही समजून घ्यायचे आहे ते तुम्हाला या दोन नेत्यांकडूनच, असे कळवण्यात येते की, असे रितसर कळवण्यात येईल, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

Published on: Jun 05, 2025 01:19 PM