Sanjay Raut : एक पाऊल पुढे किंवा एक पाऊल मागे; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांची स्पष्टोक्ती

Sanjay Raut : एक पाऊल पुढे किंवा एक पाऊल मागे; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांची स्पष्टोक्ती

| Updated on: Jun 10, 2025 | 2:01 PM

खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर भाष्य केलं आहे.

महाराष्ट्राच्या हितासाठी एक पाऊल पुढे किंवा मागे जायला देखील तयार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर दिली आहे. आज पत्रकारांशी संवाद साधतांना ठाकरे बंधूंच्या युतीवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही एक स्पष्ट भूमिका घेतली आहे. कोणाला काहीही वाटलं, काहीही म्हंटलं तरी शिवसेना मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला जे काही करता येणं शक्य आहे. ते करायला आम्ही तयार आहे. त्यासाठी एक पाऊल पुढे किंवा एक पाऊल मागे जायला आम्ही तयार आहे. त्यात आमच्याकडे कोणताही राजकीय अहंकार नाही. ही मुंबई मराठी माणसाची राहायला हवी एवढीच आमची भावना आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावर दिलेली आहे.

Published on: Jun 10, 2025 02:01 PM