‘आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील…’, विरोधकांवर बोलताना रावसाहेब दानवे यांची जीभ घसरली

‘आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील…’, विरोधकांवर बोलताना रावसाहेब दानवे यांची जीभ घसरली

| Updated on: Feb 15, 2025 | 3:04 PM

रावसाहेब दानवे यांनी केलेल्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांनी देखील पलटवार केलाय. 'ते बोलत असतील तर त्यांनी थुकले पाहिजे. ते पराभूत झाले आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

‘आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील’, असे वक्तव्य भाजपच्या संघटन पर्व कार्यशाळेत रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांची आहे. ‘आपली पार्टी सध्या इतकी मोठी आहे की आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील.’, असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी केलेल्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी देखील पलटवार केलाय. ‘ते बोलत असतील तर त्यांनी थुकले पाहिजे. ते पराभूत झाले आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. कारण जनता त्यांच्यावर थुंकली म्हणून ते पराभूत झाले आहेत. त्या थुंकीमुळेच यांचा लोकसभेला पराभव झाला आणि ते वाहून गेले. विधानसभेत तर हे पाप करून निवडून आले. सगळी भ्रष्टाचाराची थुंकलेली थुंकी ज्यामध्ये अजित पवार, अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, एकनाथ शिंदे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः नरेंद्र मोदी यांनी केले होते. मग हे थुंकलेले चाटताय कशाला आहेत. ही नवीन परंपरा त्यांनी का आणली’, असं म्हणत संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला आहे.

Published on: Feb 15, 2025 03:04 PM