Sanjay Raut : हनीट्रॅप प्रकरणावरून गंभीर आरोप; राऊतांनी दाखवला फडणवीसांचा ‘तो’ फोटो

Sanjay Raut : हनीट्रॅप प्रकरणावरून गंभीर आरोप; राऊतांनी दाखवला फडणवीसांचा ‘तो’ फोटो

| Updated on: Jul 21, 2025 | 10:52 AM

खासदार संजय राऊत यांनी हनीट्रॅप प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.

शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी हनीट्रॅप प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राऊत यांनी प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) नेते एकनाथ खडसे यांची पुराव्यासह मुलाखत घेण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. राऊत यांनी दावा केला की, 4 मंत्र्यांचा या हनीट्रॅप प्रकरणात सहभाग आहे आणि याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आहे. त्यांनी असा आरोपही केला की, याच प्रकरणाशी संबंधित पेन ड्राइव्ह शोधण्यासाठी पोलिसांनी पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. याशिवाय, राऊत यांनी प्रफुल्ल लोढा यांच्यासोबत फडणवीस यांचा फोटो दाखवत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

राऊत यांनी पुढे दावा केला की, याच हनीट्रॅपच्या माध्यमातून महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार 2022 मध्ये पाडले गेले. यापूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही असाच दावा केला होता, परंतु राऊत यांनी सर्व माहिती आणि पुरावे आपल्याकडे असल्याचे ठामपणे सांगितले. त्यांनी असा खळबळजनक आरोपही केला की, शिवसेनेचे चार तरुण खासदार हनीट्रॅपमुळे आणि काहीजण सीबीआय, ईडी यासारख्या तपास यंत्रणांच्या दबावामुळे तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शिंदे गटाकडे गेले. राऊत यांनी म्हटले की, आमचे नेते हनीट्रॅपमुळे सुरतमार्गे गुवाहाटीला गेले. या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jul 21, 2025 10:52 AM