Sanjay Raut Video : ‘शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल आता पवारांसोबत’, ‘त्या’ सत्कारावरून राऊत संतापले

Sanjay Raut Video : ‘शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल आता पवारांसोबत’, ‘त्या’ सत्कारावरून राऊत संतापले

| Updated on: Feb 12, 2025 | 10:37 AM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत मराठा पातशाहीचे धुरंधर नेतृत्व महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये काल ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सकाळच्या पत्र परिषदेत संजय राऊत बोलत असताना त्यांनी शरद पवार, एकनाथ शिंदे आणि भाजप यांना चांगलंच सुनावलं आहे. एकनाथ शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल आता पवारांसोबत असल्याचे म्हणत संजय राऊत संतापल्याचे पाहायला मिळाले. पुढे ते असेही म्हणाले, ‘राजकारणात कोणी कोणाचं शत्रू नसतं मित्र नसतं ते ठीक आहे. पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली. ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्यासोबत जे लोकं खुलेआम बसलेत. त्यांना अशा प्रकराचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारं आहे.’, संजय राऊत यांनी असं भाष्य करत शरद पवार यांनी केलेल्या शिंदेंच्या सत्कारावर टीका केली आहे. ‘शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाह यांच्या सहकार्याने फोडली. महाराष्ट्राशी गद्दारी केली. त्या एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रमाला पवारांनी जायला नको होतं.’, असंही राऊत म्हणाले.

Published on: Feb 12, 2025 10:35 AM