Sanjay Raut :  ‘…तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती, काहींच्या पोटातून…’, संजय राऊतांनी डिवचलं

Sanjay Raut : ‘…तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती, काहींच्या पोटातून…’, संजय राऊतांनी डिवचलं

| Updated on: Apr 21, 2025 | 3:12 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असले

दोन भाऊ एकत्र आल्यास कायमचं शेतावर जावू, अशी एकनाथ शिंदे यांना भीती वाटतेय, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचल्याचे दिसतंय. इतकंच नाहीतर काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडत असेल, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गाळण उडाली आहे, असंही संजय राऊत म्हणाले. पुढे राऊत असंही म्हणाले, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दोन भाऊ एकत्र आल्यावर त्यांच्यानशिबी शून्यच येणार आहे. म्हणून त्यांना हे नको आहे. त्यांची गाळण उडाली आहे. शिंदे गटाचे नेते हे चु*** आहेत, त्यांच्या मनात द्वेष भरलेला आहे. त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला नको आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी खालची टीका केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Apr 21, 2025 03:11 PM