Sanjay Raut : अर्थ खात्यातून घोटाळा झालाय; अजित पवारांनी राजीनामा देण्याची राऊतांची मागणी

Sanjay Raut : अर्थ खात्यातून घोटाळा झालाय; अजित पवारांनी राजीनामा देण्याची राऊतांची मागणी

| Updated on: Jun 02, 2025 | 4:00 PM

Sanjay Raut On Ajit Pawar : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

अर्थ खात्यातून घोटाळा झाला आहे, अजितदादा राजीनामा द्या, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. लाडक्या बहीणींच्या मतांसाठी अर्जांची छाननी केली नाही, असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केला आहे.

लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी पुन्हा एकदा महायुतीवर निशाणा साधला आहे. योजना आणली तेव्हा आमच्याकडे वेळ कमी होता त्यामुळे पात्रतेत न बसणाऱ्या महिलांनी देखील अर्ज भरले होते, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना म्हंटलं. त्यावरून संजय राऊत यांनी महायुती सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. हा घोटाळा अर्थ खात्यातून झालेला आहे. राज्याचे पैसे लुटले गेले. तुम्ही ते लुटू दिले, राजीनामा द्यायला हवा, अशी टीका राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.

Published on: Jun 02, 2025 03:56 PM