Sanjay Raut : पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut PC : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा कोणताही बदला घेतलेला नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी आज भाजप सरकारवर टीका केली आहे.
पहलगाम हल्ल्याला 12 दिवस होऊन गेले आहेत. याचा बदला काय घेतला, या नाड्या आवळल्या, त्या नाड्या सोडल्या, पाकिस्तानचे 21 युट्यूब चॅनल बंद केले. पाकिस्तानच्या हायकमिशनमधील कर्मचारी वर्ग कमी केला, याला बदला घेणे म्हणतात का? असा खोचक सवाल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? त्यांचे पक्ष फोडून टाकता, त्यांना तुरुंगात टाकता. त्यांचं आयुष्य उद्धवस्त करता, त्यांच्या कुटुंबाचा छळ करता. बदला घेता ना, आपल्यासमोर आपला कोणताही राजकीय शत्रू नको. संपवून टाकायचं. मग पाकिस्तानच्या बाबतीत एअरस्पेस बंद केली, युट्यूब चॅनल बंद केलं, याला बदला घेणं म्हणतात का? 27 लोक मारले गेल्यावर बदला कसा असायला हवा. इंदिरा गांधींचा इतिहास पाहा. त्यांना नेहरु इंदिरा गांधींचा त्रास होतो. बदला म्हणजे कोणता बदला घेतला, कोणाला मूर्ख बनवताय, पंतप्रधान इथून तिथून लोकांना मिठ्या मारत फिरतात, लोकांना मुर्ख बनवतात. काहीही बदला घेतलेला नाही, असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना म्हंटलं.
