Sanjay Raut : स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू
घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमती ५० रुपयांनी वाढल्या आहेत. केंद्र सरकारतर्फे यासंदर्भातली घोषणा सोमवारी करण्यात आली. यावरुन सरकारवर टीका केली जाते आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या आहे. मग भारतात डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्यात? ही कसली वसूली चालू आहे? कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतर जर भारतीयांना दिलासा मिळत नसेल तर निर्मला सीतारामण महागाईत तेल ओतण्याचं काम करत आहेत, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी आज भाजप सरकारवर केली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमती ५० रुपयांनी वाढल्या आहेत. केंद्र सरकारतर्फे यासंदर्भातली घोषणा सोमवारी करण्यात आली. यावरुन सरकारवर टीका केली जाते आहे. टीका करत थेट स्मृती इराणी यांनाच आंदोलन करण्यासाठी बोलवलं आहे.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, हा पक्षाचा विषय नसून गृहिणींशी संबंधित विषय आहे. स्मृती इराणी, कंगना रणौत यांना मी आवाहन करतो, त्यांच्यासह भाजपाच्या महिला नेत्यांना आवाहन आहे महिलांचं आंदोलन करावं. महिलांचं आंदोलन करण्यासाठी मी स्मृती इराणींना आमंत्रित करतो आहे. हा प्रश्न राजकीय नाही तर महिलांच्या रोजच्या जगण्याचा आहे. युपीएचं राज्य असताना सिलिंडरचे दर वाढले तेव्हा स्मृती इराणी रस्त्यावर सिलिंडर टाकून बसल्या होत्या, आता त्यांना आम्ही सिलिंडर पुरवू त्यांनी रस्त्यावर बसायला यावं, अशी खोचक टीका देखील यावेळी राऊत यांनी केली.
