Sanjay Raut : डाळ खराब आहे तर सरकार तुमचंच आहे..; संजय राऊतांची खरमरीत टीका
Sanjay Raut News : संजय राऊत यांनी आज संजय गायकवाड यांच्या मारहाणीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत टीका केली आहे.
डाळ खराब असेल तर त्याला जबाबदार कोण? तुमचं सरकारच आहे. अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर केली आहे. आमदार निवासातल्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणावर संताप व्यक्त करत गायकवाड यांनी कँटिनक कर्मचाऱ्याला माराहण केली होती. त्यावर विरोधकांकडून आता जोरदार टीका केली जात आहे. आज खासदार संजय राऊत यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना गायकवाड यांच्यावर टीका केली.
डाळ खराब आहे तर त्याला तुमचंच सरकार जबाबदार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, जर डाळ खराब असेल तर त्याला जबाबदार कोण? तुमचं सरकारच आहे. याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये गोर-गरिबांच्या घरामध्ये आदिवासी पाड्यावर मिळते. मोदी जे फुकट धान्य वाटतायेत त्याची क्वालिटी पाहा. फक्त आमदारांना ५० कोटी मिळाले आहेत, ठेकेदारांना पैसे मिळालेले नाहीत. कँटीनमध्ये भ्रष्टाचार सुरू आहेच, पण टॉवलवर मारहाण करायची का? आमदाराने मारहाण करायची आणि आपली बाजू मांडायची की मला डाळ, भात मिळाली नाही. मला असं वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
