Sanjay Raut : त्यांच्या मनातल्या वेदना समजून घेऊ; भास्कर जाधवांच्या नाराजीवर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut : त्यांच्या मनातल्या वेदना समजून घेऊ; भास्कर जाधवांच्या नाराजीवर राऊतांची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 23, 2025 | 11:42 AM

Sanjay Raut On Bhaskar Jadhav : आमदार भास्कर जाधव यांनी मंत्रिपदावरून व्यक्त केलेल्या नाराजीच्या सुरावर आज राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत. कडवट शिवसैनिक आहेत. ते आक्रमक आणि छान बोलतात, छान लढतात, आमच्या भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे? त्यांच्या मनात काय वेदना आहेत? ते आम्ही नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहेत, असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. आमदार भास्कर जाधव यांनी मंत्रिपदावरून व्यक्त केलेल्या नाराजीच्या सुरावर आज राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत. शिवसेनेचे ते प्रमुख नेते आहेत. राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. ते अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या वाढीत त्यांचे नक्कीच योगदान आहे. आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणात असतात. त्यांच्याकडे पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीने पेलवलेल्या आहेत. ते जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील.

Published on: Jun 23, 2025 11:42 AM