Sanjay Raut : … हीच युतीसाठी नांदी, राऊतांचं मोठं वक्तव्य; बघा नेमकं काय म्हणाले?
आगामी महानगरपालिकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? असा सवाल केला असता संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य करत मला वाटते ही नांदी आहे. ही सुरुवात आहे, असं म्हटलं आहे.
मराठीचा मुद्दा ठाकरे बंधूंच्या युतीसाठी नांदी ठरू शकतो, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलेला आहे. पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर चर्चा सुरू आहे असं राऊतांनी म्हटले. टीव्ही नाईन सोबत बोलताना संजय राऊतांनी हे विधान केले. मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेच्या शक्तीचा विरोध हा ठाकरे बंधूंना राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यासाठी मुद्दा बनू शकतो नांदी असू शकते? असा सवाल केला असता राऊतांनी मोठं वक्तव्य केलं. ‘मुंबईच्या अस्तित्वेवर हल्ले होत आहेत. उद्योगपतींच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून धारावीचे निमित्त आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे या दोघांची भूमिका तिच आहे थांबलं पाहिजे आणि थांबायचा असेल तर सरकारचं जे धोरण आहे की मराठी माणसामध्ये फूट पाडून वेगळं करणं त्याच्यामध्ये आपल्याला एकत्र येणे गरजेचे आहे. आपली ताकद दाखवायला पाहिजे आणि ही ताकद कोण दाखवणार मराठी म्हटलं की ठाकरे दुसरे कोणी नाही मग आधी ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे ही भावना दोन्ही बाजूला आहे‘, असं राऊत म्हणाले.
