यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना… संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?

| Updated on: Jul 04, 2026 | 4:01 PM

संजय राऊत यांच्या वक्तव्यांवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर तसेच बंड करणाऱ्या अनेकांवर निशाणा साधला. इतकेच नाही तर ठाकरे गट रामरक्षा आंदोलन करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या वक्तव्यांवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर तसेच बंड करणाऱ्या अनेकांवर निशाणा साधला. इतकेच नाही तर ठाकरे गट रामरक्षा आंदोलन करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आंदोलनाला प्रतिसाद मिळणार नाही. मंदिरात जी चोरी झाली त्यातून काही फायदा मिळतो का? म्हणून आंदोलन करत आहेत,” असं म्हटलं. तसेच, “दरवेळेस दुटप्पी भूमिका घेतली तर लोक साथ देत नाहीत,” अशी टीकाही शिरसाटांनी केली. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर बोलतना बोचरी टीकाही केली.

हनुमान चालीसा पठणावरूनही त्यांनी निशाणा साधला. “ज्यांनी यांच्या बंगल्यासमोर हनुमान चालीसा पठण केलं त्यांना 13 दिवस जेलमध्ये टाकलं आणि आता गल्ली गल्ली जाऊन पठण करणार,” असं वक्तव्य करण्यात आलं.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना, “देशात हा एकच माणूस उरला आहे ज्याला राम मंदिर आणि देशाची चिंता आहे – संजय राऊत यांना उत्तर द्यायला आम्ही बांधिल नाही, आम्ही जनतेला उत्तर देण्यास बांधिल आहोत. या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? एखादा कार्यकर्ता दूर झाला की त्याचा लिलाव झाला समजतात, त्याला गद्दार समजतात, तुम्हाला माणूस सांभाळता येत नाही. यांच्या डोक्यात एकच किडा आहे.” असं म्हटलं.

Published on: Jul 04, 2026 4:01 PM
Follow Us