“माझा मानसिक छळ करण्याचा सुषमा अंधारे प्रयत्न” संजय शिरसाट यांचा घणाघात
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे प्रकरणात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी क्लिनचीट मिळाली आहे. यामुळे सुषमा अंधारे यांनी चौकशी समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "त्या मोठ्या व्यक्ती आहेत चांगल्या अभिनेत्री आहेत.
मुंबई: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे प्रकरणात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना क्लिनचीट मिळाली आहे. यामुळे सुषमा अंधारे यांनी चौकशी समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “त्या मोठ्या व्यक्ती आहेत, चांगल्या अभिनेत्री आहेत. चौकशी समितीवर त्या आरोप करत आहेत, त्यांना जास्त कळत असेल म्हणून त्या बोलत असतात. त्यांच्यासाठी 47 वकील कोर्टात केस लढत आहेत. कोर्टात त्यांनी आपली बाजू मांडावी. त्याही कोर्टाने जर माझ्या बाजूने निकाल दिला तर काय बोलतील? विनयभंगारखे आरोप करून अनेकांचा वर्षानुवर्षे मानसिक छळ केला जातो. त्यांनीही माझ्या बाबतीत तसा प्रयत्न केला असं मला वाटत”, असं संजय शिरसाट म्हणाले.
Published on: Jun 02, 2023 09:17 AM
