Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी

| Updated on: Apr 10, 2025 | 9:45 AM

Beed Court Hearing : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम बीडमध्ये दाखल झालेले आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांची 4 महिन्यापूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती. या प्रकरणाचा खटला सध्या बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. त्यावर आज विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. आज 11 वाजता ही सुनावणी होणार आहे. त्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम हे काल रात्रीच बीडमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

Published on: Apr 10, 2025 09:44 AM