Vaibhavi Deshmukh : .. यासारख दुर्दैव अजून काय असेल?, वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक

Vaibhavi Deshmukh : .. यासारख दुर्दैव अजून काय असेल?, वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक

| Updated on: May 06, 2025 | 4:03 PM

Santosh Deshmukh Death Case : सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिला राज्यातून शुभेच्छा मिळत आहेत. पुष्पगुच्छ, गिफ्ट्सही मिळाले आहेत, त्यावर वैभवीने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिचा आज वाढदिवस आहे. कालच राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात वैभवीने उत्तम यश मिळवल आहे. तर आज वाढदिवस असल्याने वैभवीवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. राज्यभरातून तिच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यातील अनेक भागातून तिला पुष्पगुच्छ आणि गिफ्ट पाठवण्यात आलेले आहेत. या सगळ्यावर वैभवीने प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत वैभवी भावनिक झाली. ‘वाढदिवसाच्या दिवशीच मला माझ्या वडिलांचा महिना घालावा लागतो आहे, यासारख दुर्दैव अजून काय असेल? कालचा लागलेला निकाल आणि आज माझ्या वाढदिवसासाठी मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण माझ्या वडिलांच्या शुभेच्छा यापुढे मला कधीच मिळणार नाही. दरवर्षी वाढदिवसाला माझ्या वडिलांनी दिलेल्या शुभेच्छाच सगळं काही होतं. मागच्या वर्षी मी माझ्या वडिलांसोबत साजरा केलेल्या वाढदिवसाचे फोटो पाहून खूप दु:ख होतं आहे. त्यांना न्याय मिळावा एवढीच फक्त आता इच्छा आहे’, अशी भावनिक प्रतिक्रिया वैभवी देशमुखने दिली आहे.

Published on: May 06, 2025 02:49 PM