मोठी बातमी, संतोष देशमुख हत्याप्रकरण, उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती
एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 78 दिवस उलटून गेले असून या हत्याप्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्याला तत्काळ अटक व्हावी, इतर आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करावी या व इतर मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कालपासून वैभवी देशमुख, धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे गावकरी अन्नत्याग आंदोलनासही बसले आहेत. याचदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ संतोष देशमुख हत्याप्रकरण गाजत असून त्यामुळे अख्ख राज्यही हादरलं आहे. विविध मागण्यांसाठी कालपासून मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत. याप्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा, उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी असा अनेक मागण्या गावकऱ्यांच्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आता हा महत्वाचा निर्णय समोर आला आहे. उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे.
