Sambhaji Brigade : ‘जो बिरोबाचा नाही झाला, तो धनगर समाजाचा काय होईल?’, संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार

Sambhaji Brigade : ‘जो बिरोबाचा नाही झाला, तो धनगर समाजाचा काय होईल?’, संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार

| Updated on: Apr 17, 2025 | 1:08 PM

Santosh Shinde Vs Gopichand Padalkar : संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांच्या टीकेवर पालटवर करण्यात आलेला आहे. यावेळी जो माणूस स्वत:च्या कुलदेवतेचा नाही झाला तो समाजाचा काय होईल? असा उपरोधक टोला शिंदेंनी लगावला आहे.

गोपीचंद पडळकर हा लाचार माणूस आहे, अशी टीका संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली आहे. जो माणूस बिरोबाचा झाला नाही, तो धनगर समाजाचा काय होणार? असा पलटवार देखील संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केला आहे. काल गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडवर जोरदार टीका केली होती. वाघ्या कुत्र्याचा विषय ब्रिगेडींनी काढला असं पडळकर म्हणाले होते.

‘शरद पवार यांना माझी एक विनंती आहे. पवारांनी त्यांचा पक्ष अजित पवारांकडे दिला आहे. आता शरद पवार यांच्याकडे फावला वेळ आहे. त्यामुळे त्यांनी या दोन वर्षात त्यांना पाहिजे तसा इतिहास लिहावा’, असा खोचक टोलाही पडळकरांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला होता. त्यावर आता संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी पलटवार केला आहे. ‘जो माणूस आपल्या कुलदेवतेचा बिरोबाचा होऊ शकत नाही, जो माणूस धनगर समाजाचा होऊ शकत नाही, तो समाजाचा काय होणार? पडळकर सारखा माणूस हा लाचार म्हणून उठसूट कोणावरही घाणेरड आणि गलीच्छ बोलण्यासाठी पाळलेला माणूस आहे, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.

Published on: Apr 17, 2025 01:05 PM