Satara | रांगोळी काढली… आरती केली… प्रार्थना म्हटली अन्… सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस

| Updated on: Jan 27, 2026 | 11:54 AM

अभिनेते सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सयाजी यांनी आता पर्यंत लाखो झाडं लावली आहेत. पण केवळ झाडं लावून ते थांबले नाहीत, तर त्या झाडांची निगा राखली जाते का? ती झाडं किती मोठी झाली? याचीही माहिती दते घेत असतात. साताऱ्यातील सह्याद्रीच्या देवराईत त्यांनी काही झाडांचं पुनर्रोपण केलं होतं. त्यात एक डेरेदार वडाचं झाडही होतं. या झाडाच्या पुनर्रोपणाचा चौथा वाढदिवस सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सयाजी यांनी आता पर्यंत लाखो झाडं लावली आहेत. पण केवळ झाडं लावून ते थांबले नाहीत, तर त्या झाडांची निगा राखली जाते का? ती झाडं किती मोठी झाली? याचीही माहिती दते घेत असतात. साताऱ्यातील सह्याद्रीच्या देवराईत त्यांनी काही झाडांचं पुनर्रोपण केलं होतं. त्यात एक डेरेदार वडाचं झाडही होतं. या झाडाच्या पुनर्रोपणाचा चौथा वाढदिवस सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वडाच्या झाडाच्या वाढदिवसानिमित्ताने झाडाभोवती सुरेख रांगोळी काढण्यात आली होती. त्यानंतर सुवासिनींनी या झाडाला ओवाळले आणि मग सर्वांनी मिळून निसर्गाची प्रार्थना म्हणत झाडाचा जल्लोषात वाढदिवस साजरा केला. यावेळी बच्चे कंपनीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. यावेळी पारंपरिक वाद्य वाजवत अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील ठेका धरला. यावेळी मोठ्या संख्येने वनप्रेमी सह्याद्री देवराई प्रकल्पात उपस्थित होते.

 

 

Published on: Jan 27, 2026 11:54 AM