School Students: बापरे काय आहे हे! शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास? प्रशासनाचं दुर्लक्ष

School Students: बापरे काय आहे हे! शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास? प्रशासनाचं दुर्लक्ष

| Edited By: | Updated on: Jul 21, 2022 | 12:24 PM

ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे शाळेत जायचे सुद्धा वांदे झालेत. पण कोरोनात हाल झालेला विद्यार्थी अजून किती दिवस शिक्षणापासून वंचित राहणार.

मालेगाव: गेल्या अनेक दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. परिणामी काही ठिकाणी पावसाचं पाणी साचलंय, काही ठिकाणी पूर आलाय, रस्ते ब्लॉक झालेत, लोकांचे प्रचंड हाल झालेत. या सगळ्याचा मोठा परिणाम शिक्षण विभागावर (Education Department)  होतोय. विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे हाल होतायत. ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे शाळेत जायचे सुद्धा वांदे झालेत. पण कोरोनात हाल झालेला विद्यार्थी अजून किती दिवस शिक्षणापासून वंचित राहणार. मालेगावात विद्यार्थी शिक्षणासाठी पुराच्या पाण्यातून वाट काढतायत. हा व्हिडीओ (Viral Video) बघूनच तुम्हाला कळेल. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागतोय. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना असा जीवघेणा प्रवास करावा लागतोय. ही दृश्य मन हेलावून टाकणारी आहेत. नागरिकांकडून इथे पूल बांधण्याची मागणी करण्यात आलेली आहे तरी प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे याचे सगळे परिणाम विद्यार्थ्यांना सहन करावे लागतायत.