‘रोहित पवार पाहुणे कलाकार’; शंभूराज देसाई यांचा रोहित पवारांवर पलटवार

| Updated on: Aug 27, 2023 | 8:33 AM

राष्ट्रवादीच्या फूटीनंतर शरद पवार हे बंडखोऱ्यांच्या जिल्ह्यात जाऊन सभा घेत आहेत. तर त्यांच्याबरोबर त्यांच्या गटाचे नेते देखील या सभांना हजेरी लावतात. साताऱ्यात ही शरद पवार यांची काल सभा झाली. ज्यात रोहित पवार यांनी जोरदार टीका केली होती.

Follow us on

सातारा : 27 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूटीनंतर अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या गटाचे नेते हे बंडखोऱ्यांच्या जिल्ह्यात जाऊन सभा घेत आहेत. अशाच सभा नाशिक, बीड, सातारा आणि कोल्हापूर येथे पार पडल्या आहेत. यावेळी साताऱ्यात पार पडलेल्या सभेत आमदार रोहित पवार यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता देसाई यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

दहिवडी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार रोहित पवार यांनी देसाई यांच्यावर टीका केली होती. तर देसाई कधी तुमच्या तालुक्यात आले तरी आहेत का? असा प्रश्न केला होता. याला देसाई यांनी प्रतिउत्तर दिले असून रोहित पवार हे पाहुणे कलाकार म्हणून आमच्या जिल्ह्यात आले होते. आमच्या जिल्ह्याची चिंता करण्याची त्यांना गरज नाही असा टोला देसाई यांनी लगावलाय. तसंच माण खटाव तालुक्यासाठी पुरेशा टँकरची व्यवस्था आम्ही केली आहे.

पवार साहेबांनी दुष्काळाचे संकेत दिले असून ते राज्यातील जेष्ठ नेते आहेत. त्यांचा राज्यात अनुभव आहे. दुष्काळी भागात जेवढी पाण्याची मागणी आहे तेवढे पाणी दिले आहे. पवार साहेबांनी भविष्यातील संकेत दिले असतील तर आजच्या परिस्थितीत जिल्ह्यातील धरणात 95% पाणीसाठा असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.