VIDEO | ‘शाहू महाराज यांनी लोक भावनेचा विचार करावा, आम्हाला आनंदच’; शरद पवार यांचे कोणते संकेत?

| Updated on: Aug 26, 2023 | 2:18 PM

सध्या राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवरून जोरदार तालिम पाहायला मिळत आहे. त्याचअनुशंगाने राज्यातील प्रमुख पक्ष हे मैदानात उतरले आहेत. तर शरद पवार गटाकडून राष्ट्रावादी फुटीनंतर बैठका आणि सभांचा जोर वाढला आहे. त्याचदरम्यान शरद पवार यांनी नाशिक, बीड, सातारानंतर कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात निर्धार सभा पार पडली.

Follow us on

पुणे : 26 ऑगस्ट 2023 | राज्यात आमागी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. सर्वच पक्ष हे आता मैदानात उतरले असून मतदारसंघाच्या आढावा बैठकांसह सभा घेत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राज्यभर सभा घेतल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, रोहित पवार, जयंत पाटील आणि इतर नेते राज्य पिंजून काढत आहेत. यादरम्यान काल पवार यांची कोल्हापूरात निर्धार सभा पार पडली. यावेळी त्यांच्यासह इतर नेत्यांनी अजित पवार आणि त्यांच्या गटावर जोरदार टीका केली. सध्या जिल्ह्यात याच सभेची चर्चा रंगली आहे. मात्र याच्याही पेक्षा चर्चा ही लोकसभा उमेदवारीवरून सुरू आहे.

कोल्हापुरात सध्या दोन शिंदे गट आणि एक भाजपचा खासदार आहे. तर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद खूप आहे. त्याच ताकदीवर धनंजय महाडिक हे खासदार झाले होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादी विरोधात भूमिका घेतली आणि ते पडले. तर तेथे संजय मंडलिक हे खासदार झाले. मात्र मंडलिक यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केल्याने कोल्हापुरची जनता त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात यावी अशी लोकांची मागणी आहे. त्यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शाहू महाराज यांच्याबाबत असणाऱ्या लोक भावनेवर बोलताना पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी दुसऱ्या कुणाबद्दल बोलणं योग्य नाही. पण लोकांच्या इच्छेचा सन्मान तर शाहू महाराजांनी केला तर येथे बसलेल्या आम्हा सर्वांनाच आनंद होईल असे म्हटलं आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा नसल्याचे देखील म्हटल्याचे शरद पवार म्हणाले.