Sharad Pawar : म्हणून शरद पवारांनी मानले मोदींचे आभार..
Sharad Pawar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी केल्याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
तब्येतीची विचारपूस केली म्हणून शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली होती.
ऑपरेशन सिंदूरनंतर परदेशात जाऊन भारताची दहशतवादाच्या विरोधात भूमिका मांडणारे देशाच्या खासदारांचे शिष्टमंडळ परत भारतात परतले आहे. या सर्व खासदारांची पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतली. या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे देखील होत्या. यावेळी त्यांच्याशी बोलताना मोदींनी सुळेंना शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल विचारणा केली. त्यावर आज शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
Published on: Jun 11, 2025 03:09 PM
